विद्यार्थ्यांना मारणे - ( पुर्वी होते हे खरे आहे पण एखादा धपाटा किंवा अधिक धपाटे, मात्र बहुतांशी वेळा पाठीवर वगैरे ) हल्ली मारणे किंवा मारण्याच्या पद्धतींमधील रानटी प्रकार वाचायला मिळतात.

संस्कृती - कॉन्व्हेंटमध्ये मेंदी लावून येणे वगैरे गोष्टींसाठी शिक्षा मिळालेली वाचली आहे.

शिस्त - यात खर्चिक पोषाख वगैरे आहेत.

हल्लीचे काही शिक्षक - वर्गातच कोंबडी मारून तिचा रस्सा मुलांसमोर केल्यामुळे मुले चळचळा कापत होती व रडत होती अशी एक बातमी मध्ये वाचली होती.

एकंदर, आमच्या काळचे शिक्षक मुलांना प्रेमाने वागवायचे असे वाटते खरे!

आपण उल्लेखलेले प्रसंग हे तर तिऱ्हाईतासाठीसुद्धा अमानवी वाटतात. आपल्याच विद्यार्थ्याला असे वागवणे म्हणजे कमाल वाटते.

माझ्यामते असलेली कारणे - शिक्षकांची विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता नष्ट झालेली असू शकते. राग हा पुर्वीच्या शिक्षकांनाही येत असणार, पण त्यात थोडेसे तरी प्रेम किंवा आपुलकी असणार. अर्थात आत्ता सर्वच शिक्षक तसे आहेत असे कुणीच म्हणत नाहीये. पण एकंदर प्रेमळ भावना नष्ट झालेली असावी.

आजची मुले - प्रचंड एक्स्पोजर असलेली ही मुले, मुळात एका घरात एक किंवा दोन मुले प्रामुख्याने असतात व हल्लीचे राहणीमान पुर्वीपेक्षा बरेच सुखकर आहे या पार्श्वभूमीवर बरीच जास्त हट्टीसुद्धा असू शकतील. ( तुलनेने पुर्वीच्या मुलांपेक्षा ). मी जेव्हा १९७५ ते १९८५ या काळात शाळेत जायचो तेव्हा फोन, मोबाईल फोन, व्ही सी आर, टी. व्ही, संगणक, फ्रीज, मोटारगाडी, स्वयंचलीत दुचाकी वगैरे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरी तरी अजिबात नसायचे. ( अर्थात काही गोष्टी नंतरच आल्या हेही खरे आहेच. )

पण आता या सर्व गोष्टी आहेत व त्यांचा वाढता पगडा मुलांवर आहे. एक जबरदस्त आकर्षण ! माझा एक मित्र, त्याच्या १२ वर्षाच्या मुलाने उगीच चुकीच्या वेबसाईटस पाहू नयेत याची काळजी घेतो. ( तो पाहत नाही, पण काळजी घ्यावी लागणे हा एक प्रॉब्लेम आहे खरा. ) अशा परिस्थितीमध्ये मुलांची मानसिकता अति हट्टी झाली तर ते पालकांचेच काय, शिक्षकांचेही कदाचित ऐकणार नाहीत. बर, हल्ली शिक्षकही पुर्वीसारखे बिचारे आहेत असे वाटत नाही. त्यांनाही प्रचंड एक्स्पोजर आहेच. तेही कदाचित एकटेच वाढलेले, हट्टी वगैरे असू शकतात. त्यामुळे एकंदर माणुसकी कमी झाली असावी व इगो वाढल्यामुळे असे प्रकार घडत असावेत असे वाटते.

अवांतर - मला असेही वाटते की वाढीव मांसाहारामुळे काहीवेळा माणसाची प्रवृत्ती अमानवी होऊ शकत असावी. अर्थात, याला काहीही शास्त्रीय पुरावा नसणारच!

धन्यवाद!