जगाच्या अंतसदृश्य परिस्थितीचं वर्णन करणा-या कादंब-या आणि (त्यावर आधारित किंवा स्वतंत्रही) चित्रपट काही कमी आलेले नाहीत. अनेक प्रतिथयश मोठ्या कलावंतांनी या विषयाला हात घातल्याचं दिसतं. मात्र या कलावंतांचा, लेखकांचा, दिग्दर्शकांचा दृष्टिकोन या कादंबऱयांना एकमेकांपेक्षा वेगळा बनवतो. कामूची प्लेग, स्टिफन किंगची द स्टॅण्ड, एच.जी.वेल्सची वॉर ऑफ दी वर्ल्डस, जॉन विन्डहॅमची द डे ऑफ द ट्रिफिड्स आणि रिचर्ड मथीसनची आय अ‍ॅम लेजन्ड ही या कादंब-यांची काही उदाहरणं. यातल्या अनेकांची माध्यमांतरही झाली आहेत. आणि ती कमीअधिक प्रमाणात यशस्वीही झाली आहेत. कादंब-यांच्या फॉर्ममध्ये पाहिलं तर साधारणपणे व्यक्त होणारा आशय हा दोन प्रकारात मोडणारा असल्याचं दिसून येतं. एक प्रकारचा लेखक आपल्या कथानकाचा सांगाडा सरळसरळ विज्ञानकथा किंवा साहसकथा असल्यागत वापरतो, तर दुस-या प्रकारचा लेखक ही समस्या, त्यातून उदभवलेली परिस्थिती ही रुपकासारखी वापरताना दिसतो. वॉर ऑफ द वर्ल्डस किंवा ट्रिफिड्स पहिल्या प्रकारात मोडतात. लेजन्ड किंवा होजे सारामागोचीचा ब्लाईन्डनेस दुस-या. द ...
पुढे वाचा. : ब्लाईन्डनेस- समाजाची रचना आणि अराजक