प्रत्येक शाळा आपापले कांही तरी नियम बनवते. आणि ते नियम कुठल्यातरी समुदायाला जाचक वाटतात. बरं हे केवळ भारतामधेच घडत नाही, तर सगळ्या जगात घडते. फक्त कमी जास्त  प्रमाणात !

माझी मुलगी लहान असतांना एकदा ( धाकटी) ने कांही तरी सण होता म्हणुन, मेंदी लावली होती. आणि नंतर मात्र एकदम घाबरली. दुसऱया दिवशी शाळेत जायचं होतं तर म्हणे मी नाही जाणार. म्हंटलं कां? तर शाळेत मेंदी अलाऊड नाही म्हणुन …. शेवटी दिला चिठ्ठी लिहुन दिली की लग्नानिमित्य मेंदी लावली होती , तेंव्हा कुठे ती शाळेत गेली.

आपल्याकडे मेंदी, बांगड्य़ा, गजरा,  गळ्यातलं, किंवा कुंकाची टीकली, नेल पॉलिश  ह्या पैकी शाळांमधे कांहीच अलाउड नसतं. एखाद्या धर्माची चिन्हे वापरू नयेत असा ह्या मागचा उद्देश असावा. ...
पुढे वाचा. : शाळांचे नियम