वेड हे देऊन मजला सांगते ती,
की शहाण्यासारखा तू वाग आता

वा. ही द्विपदी रचनेला आणि अर्थाला दोन्हीप्रकारे चांगली वाटली

का समुद्रा तू असा भरतीस येतो?

ह्याऐवजी

का असा येतोस भरतीला समुद्रा?

असे केल्यास कसे वाटेल?

किंवा

का समुद्रा तू असा भरतीस येसी 

असेही करून पाहता येण्यासारखे आहे. (येथे 'येसी' एखादवेळेस नकोसे वाटेल; पण पुढे तुम्ही 'माझिया' वापरलेले आहे त्यामुळे चालायला हरकत नाही, असे वाटते.)