पूर्वीचे शिक्षक हे जास्त प्रेमळ आणि मुलांना कमी मारणारे होते अस तुम्हाला म्हणायचे आहे का? मला उलट वाटते. म्हणजे प्रेमळ हा फॅक्टर कमी जास्त झाला आहे का माहित नाही. पण, हल्लीचे शिक्षक मुलांना नक्कीच कमी मारत असणार. एकतर हल्ली लोकं जास्त संवेदनशील आहेत. आई वडील सुद्धा स्वतःच्या मुलाला मारत नाहीत (चांगल्याकारणासाठी अर्थात), ते शिक्षकांना काय मारू देणार? शिक्षकाने मुलाला मारले म्हणून घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केल्याचे मध्ये वाचले होते. अमेरिकादी देशांप्रमाणे आपल्याकडे सुद्धा मुलांना न मारण्याविषयी वगैरे कायदे होतीलच आता... बाकी खाली मिलिंद ह्यांच्याशी सहमत. २४*७ बातम्यांमुळे असल्या छोट्या छोट्या बातम्या देखिल लगेच कळतात आणि आपण लगेच निष्कर्ष काढू लागतो.