मी शुद्ध पुणेकर आहे, मला माहीत आहे की हल्ली बरीच दुकाने दुपारी चालू असतात.

१००% सहमत काय बोललात राव..  वा!  अगदी बिनतोड मुद्दा आहे हा.  प्रश्न फक्त इतकाच आहे की दुकाने उघडी 
असली तरी हव्या त्या वस्तू मिळतात का आणि तयार असलेली वस्तू देतात का?  (उदा.  चटणी आणि ती पण 
विकत).  मुंबईत सहसा हातचे गिऱ्हाईक जाऊ देत नाहीत.  आपल्याकडे वस्तू नसेल तर नोकराला शेजारच्या 
दुकानात पाठवतात.  आपले गिऱ्हाईक शेजारच्या दुकानात जाऊ देत नाहीत.  गिऱ्हाईक जास्त वेळ ताटकळावे 
लागले तर चहा मागवतात.  हातचे गिऱ्हाईक गेले तर स्वत:चा अपमान समजतात.