लेख नीट वाचला तर, टिकेचा रोख हा, पुरुष, समाजातील तथाकथीत विचारवंत, भ्रष्ट नेते मंडळी, प्रतिष्ठित गुंड-मवाली, ह्यालोकांवर आहे. 

प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात येईल, माझा आक्षेप पेशव्यांनी राज्य न करता 'नाच गाण्यात' काळाचा अपव्यय केला या विधानाला आहे.

... दोष फ़क्त ब्राम्हणांना न देता, ईतरांनाही दिला गेला आहे.  सर्व राजे काही ब्राम्हण नव्हते. मुळातच रोख हा व्याक्तिं/जातीवर नसुन....

मराठेशाही, मुघलशाही, कुतुबशाही, आदीलशाही यांना 'इतर' राजे रजवाडे आणि पेशवाईचा मुद्दाम स्वतंत्र उल्लेख प्रतिभा जोशींना का करावासा वाटला? हा पंक्तीप्रपंच करताना 'ब्राह्मण' जातच त्यांच्या नजरेसमोर होती हे उघड सत्य आहे. एक मराठेशाही वगळता इतर तिन्ही मुसलमान राजेरजवाड्यांनी केलेले थेर प्रतिभाताईंना नजरेआड करावेसे वाटतात. (त्या सर्वांना फक्त 'इतर राजे' संबोधून, पेशवाईला झोडपण्यासाठी न्याय्य बैठक मिळावी या करीता, 'तोंडी लावणे' केले आहे.)पेशवाईला मात्र स्वतंत्ररित्या सूक्ष्मदर्शक यंत्रा खाली घ्यावेसे वाटते. का? पेशवाईत राज्यकर्ते ब्राह्मण होते म्हणूनच नं?

त्या लेखाबद्दल प्रतिसाद देण्यासाठी, त्या लेखाखालीच link दिली गेली आहे. आपले मुद्दे मांडायला, प्रतिभा जोशी इथे नाहीत. आपले मुद्दे तिथेच मांडले असते, तर, बहुदा, प्रश्नाचं उत्तरही मिळालं असतं आणि, गप्प बसून न राहता, योग्य त्या ठिकाणी बोलल्याच समाधानही झालं असतं.

प्रतिभा जोशींच्या लेखाची link मनोगतावर देण्यात आली होती. तो लेख वाचल्यावर मनोगतावर प्रतिक्रिया दिली तर काय गुन्हा केला का? 'त्या लेखाच्या खाली link दिली आहे आणि तिथे प्रतिक्रिया द्यावी' हा उपदेश करण्याइतके मनोगती अज्ञानी आहेत का? मनोगतावर दिलेल्या link वर अभिप्राय मनोगतावरच योग्य आहे.

जातीद्वेशावरून चर्चा व्यक्तीद्वेशाकडे वळत आहे. लेख नीट वाचला तर, गप्प बसून न राहता, योग्य त्या ठिकाणी बोलल्याच समाधानही झालं असतं. वगैरे वक्तव्य, मी लेख नीट न वाचताच अभिप्राय दिला आहे, माझा अभिप्राय मी अयोग्य ठीकाणी देत आहे. वगैरे व्यक्तिगत टिपण्णी अनावश्यक आहे. नाईलाजाने मला त्याच भाषेत स्पष्टीकरण द्यावे लागले.

चर्चेचा रोख असाच राहाणार असेल तर मी चर्चेत भाग घेऊ ईच्छित नाही याची  संबंधितांनी कृपया नोंद करावी.