आधीच उकाडा त्यातून मतकेंद्रांचे गोंधळ, त्यात मतदार यादीत नावच नाही इथपासून ते या मतदान केंद्राच तुमचा राहता भाग जमा होत नाही इथपर्यंत काहीही उत्तरे देऊ शकणारे निवडणूक अधिकारी, वृद्धांचा विचार न करता आदचणीच्या जिन्यांनी तीनतीन मजले चढल्यावर असलेले मतदान कक्ष हे सगळे पाहून 'हाच हक्क मिळवण्यासाठी दीडशे वर्षे लढावे लागले असेल तर त्याने नक्की काय साधले? ' असा प्रश्न पडला. एक वृद्ध स्त्री 'माझे वय शंभर वर्षे आहे, आता उभे राहवत नाही तरी मला जास्त वेळ थांबवू नये' असे परोपरीने सांगत असतानाही तिचे नाव यादीत शोधण्यासाठी संथपणे याद्या तपासणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून धक्का बसला. कमीतकमी तिचे नाव शोधेपर्यंत तिला बसायल एखादी खुर्ची दिली असती तर त्याचे असे काय बिघडले असते असे वाञले. एकूण मतदान हे मोले घातले रडाया असे होणार अशी भीती वाटते.

टिंबक