मी सुद्धा सिंहगड रस्ता, धायरी आणि त्यामुळे बारामती मतदारसंघातच आहे. पण आधी शनिवार पेठेत राहत होतो आणि अजून मतदार यादीत बदल करवून घेतला नसल्यामुळे मला पुण्यातून उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देता आले, हा मुद्दा वेगळा. पण आपण म्हणता त्याच्याशी पूर्णपणे सहमत.

त्यामुळेच काल पुण्यात नीचांकी मतदान होण्यास आपण वर उल्लेखलेले मुद्दे बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत असे वाटते. माझ्या ओळखीतच ४-५ जणांनी आपण बारामतीत जाऊन पडलो म्हणून मतदान केलेले नाही. असे अनेकजण असणारच.