माझं गाव यवतमाळपासून ३५ किमीवर यवतमाळ जिल्ह्यातच आहे. मात्र आम्ही मतदान चंद्रपुर मतदारसंघासाठी केलं. याला लोकशाही (ची थट्टा) म्हणतात. प्रत्येक जिल्ह्याचा एक मतदारसंघ का करू नये ? त्यासाठी लोकसंख्येचे प्रमाण ठरवू नये. त्यामुळेच तर कमी पडले म्हणून इकडचे तिकडचे जमा केले असं झालं असं मला वाटते.
शाळांपेक्षा जवळच्या पोलिसस्टेशनमध्येच मतदान असावे असे वाटते. तसेच जेष्ठ नागरिक, अपंग यांसाठी वेगळी रांगही असावी. बाकी कमी मतदान होणे एका विशीष्ट पक्षासाठी चांगले असते म्हणून ते मतदान कमी व्हावे म्हणून प्रयत्न करत असावेत.