ऋषिकेशभाऊ,
'जळणे' - आपल्या प्रतिसादाचा ज्वलंत (:-) ) विषय...
हा गुणविशेष कोणाला लागू आहे? मुंबई की पुणे?
कोणी तुलना करू नये असे आपण म्हणता, मग ही चर्चा सुरू कशी झाली ऋषिकेशभाऊ?
आता शेवटचा प्रश्नः
। वर कोणीतरी इतरही शहरे आहेत असे सांगितले. पण त्यांनी मध्ये पडू नये त्याचे कारण थोडक्यात सांगतो.
हे आपले उद्गार कोणासाठी आहेत बरे? आणि तुमचे कारण तुम्ही सांगितलेच नाही असे काय ते?
बाकी आपले दोन पैसे छान आहेत, आणि मुंबई तुम्हाला बस्स आवडते म्हणून आवडते ना? हाच तो मुंबईकरांचा सरळमार्गी स्वभाव आहे, उगीच आपल्या मतांची कारणमीमांसा ते करत नाहीत.
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नगरी कालच्या काळी (त्याला भूतकाळ असे म्हणतात आणि तो बाळगून बसणे म्हणजे वर्तमान आणि पर्यायाने भविष्यही गमावणे) नसेल पण आज जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण आहे हे आपण सारे जाणतो, मग आपल्या प्रांतिकता सोडून या गोष्टीचा जागतिक अभिमान आपण बाळगू शकत नाही का?
- मीसुचि