डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
हनीमुनची ती रोमांचक दिवसांची सुट्टी संपवुन आम्ही पुण्याला परतत होतो. बैगलोर-पुणे नागरकॉइल एक्सप्रेस ने परतीचा प्रवास होता. गाडी वेळेत संध्याकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मला लागली. बोगी नंबर वगैरे शोधुन सामान सावरत आत मध्ये शिरलो.
आत मध्ये शिरत असतानाच बायको मला म्हणाली, “ए ती मुलगी बघ ना कशी बघती आहे तुझ्याकडे!” मी लगेच शोधाशोध केली. आमच्या कंपार्टमेंट पासुन काही सिट दुरुन एक २५वीशीतली मुलगी टक लावुन बघत होती. बायको पुढे म्हणाली.. “अशी काय बघती आहे ती? तु काही आणि एवढा स्मार्ट, हॅडसम वगैरे नाही आहेस बरं का!!”
आमची ए/सी केबीन पुर्ण रिकामी होती. कुणाचेच रिझर्वेशन नव्हते. त्यामुळे पुण्यापर्यंत या पुर्ण केबीनमध्ये आम्ही दोघचं या विचाराने खुश झालो. सामान अस्ताव्यस्त फेकुन मस्त ताणुन दिली. थोडा आराम झाल्यावर मी कानात हेडफोन घुसडुन बायकोच्या मांडीवर पहुडलो तर बायको कुठलेतरी पुस्तक वाचत बसली. थोड्यावेळाने सहजच डोळे उघडले तर ती मगाचची मुलगी उघड्या दारातुन हळुच आत मध्ये वाकुन बघत होती. तिला बघुन जाम घाबरलो आणि ताडकन उठुन बसलो. मला उठलेला बघुन ती तेथुन निघुन गेली. नंतर माझे लक्षच ...
पुढे वाचा. : हनिमुनचा भयावह शेवट