काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
कांही ऑफोशिअल कामा साठी काल नागपुरला आलो. सकाळच्या फ्लाइटने नागपुरला विमान उतरतांना बाहेरचे तापमान ३२ डिग्रीज सेल्सियस आहे म्हणुन सांगितलं तेंव्हाच छातिमधे धस्स झालं. म्हंटलं, सकाळचे ८-१५ झालेत आणि आत्ताच ३२ म्हणजे दुपारी काय पुढे वाढुन ठेवले आहे ते कोणास ठाउक.
तसा मी नागपुरला पुर्वी राहिलो आहे. सगळं लहानपण इथेच गेलं पण आता मात्र जास्त कोरडं उन्हं सहन होत नाही. दुपारी बाहेर फिरावं लागलं. एका डिलर कडे बसलो होतो, तो सांगत होता ,की कालचे टेम्परेचर ४६ होतं.ऐकुनच एकदम काटा आला अंगावर. नागपुरचा उन्हाळा म्हणजे दिवसा ४५-४६ तापमान आणि रात्रि १० वाजे पर्यंत गरम हवा. सुर्यास्ता नंतर पण कमित कमी ४ तास गरम वारे सुरु असतात.
कांही वर्षांपुर्वी मी ह्याच टेम्परेचरला अगदी भर दुपारी बाइक घेउन फिरत असे. दुपारी बाहेर निघतांना एक पांढरा पंचा फोल्ड करुन डोक्याला मुंडास्या प्रमाणे बांधायचा, त्या मधे एक कांदा ठेवण्याची पण पध्दत आहे इथे. कांही लोकं कांदा फोडून पण ठेवतात डोक्यावर.पण काल मात्र अगदी जिवावर आलं बाहेर फिरणं. कारण तो पंचा नव्हता बांधायला डोक्याला. खिशातला रुमाल काढुन कान बांधले.उएखादा भुट्टा जसा शेगडीवर शेकावा, तसा शेकला जात होतो. पुर्वी ह्याच उन्हात बाइक वर किती फिरायचो ते आठवलं. फुल स्लिव्ह शर्ट घालायचॊ पुर्वी त्यामुळे शर्टच्या बाहेर रहाणारा हाताचा भाग म्हणजे पंजाचा मागचा भाग टॅनिंग मुळॆ काळा हौऊन गेला होता तेंव्हा.
उन्हाळा अहमदाबादला पण आहे , पण फक्त रात्री लवकर गार होतं. मी लहान असतांना, घरासमोरच्या अंगणात संध्याकाळी पाणि शिंपडून तिथे तारे आणी चांदण्या मोजत ...
पुढे वाचा. : काहितरी लिहायचं म्हणुन..