ज्यांच्याकडे रेशनकार्ड, गाडीचे लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट ह्या पैकी काहीही असेल अश्यांना खरं म्हणजे शासनाने स्वतःच त्या नागरीकाचे वय ओळखून त्याच्या घरच्या पत्यावर इलेक्शन कार्ड पाठवायला हवे.
अशी अपेक्षा आपल्याकडच्या 'कारभाऱ्यां'कडून ठेवणे (जरा) जास्त होतं
परंतु, खरंच रेशनकार्ड, गाडीचे लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट या सारख्या कागदपत्रांना प्रमाण मानून शासनाने सोयीस्कररीत्या मतदार पत्र देण्याची सोय करावी. ते सगळ्यांसाठी सुलभ होईल.
माझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २ लोकसभा निवडणुका झाल्यात आणि दोन्ही वेळेला नाव नोंदवून, सगळी कागदपत्र वेळेत पुरवूनही माझं नाव मतदार यादीत नाही!! आता माझी कितीही इच्छा असली तरी माझा 'जन्मसिद्ध अधिकार' काय डोंबल बजावणार?
तसेच माझ्या आजीच्या बाबतीत, दोन्ही वेळा तिचे नाव 'मयत' यादीत नोंदवूनदेखील ते मतदार यादीतून काढले नाही...