तुम्ही सर्वेक्षण ( त्यातही सर्व्हेक्षण अहवाल ) असा शब्द वापरल्यामुळे आपोआपच काही विशिष्ट पद्धतीने केलेल्या अभ्यासाची अपेक्षा निर्माण झाली. एरवी मी इतर लेखांसारखा एक लेख एवढ्याच दृष्टीने त्याकडे पाहिले असते. मात्र मला अजूनही वाटते, की संशोधनात्मक पद्धतींचा वापर करून तुम्ही हा विषय पुन्हा मांडल्यास त्यातून खूप चांगली चर्चा होऊ शकते व मुख्य म्हणजे त्यातून चांगली माहिती निर्माण होऊ शकते.  एक निश्चित आहे, की वाचन करणाऱ्या सर्वच वाचकांचा विचार कोणीच करू शकणार नाही, पण काही भौगोलिक/प्रादेशिक वा कालिक किंवा अशाच काही निकषांचा वापर करून शंभर-एक वाचकांची मते पाहिल्यास काही माहिती मिळू शकते. एक दहा-बारा प्रश्नांची प्रश्नावली नि पुणे शहर किंवा त्यातही आणखी एखादीच पेठ वा परिसर घेऊन किंवा त्यातही युवा वाचक, वृद्ध वाचक अशी कालिक मर्यादा घेता येईल. निकष आपण ठरवा मी एक उदाहरण दिले.