माझा मुद्दा असा आहे की स्थानदर्शक 'त' प्रत्यय हा सर्वसामान्य (general) नसून काही विविक्षित (specific) ठिकाणीच वापरला जातो. (याला पुष्टी म्हणून मी काही उदाहरणेदेखील दिली आहेत, ज्यात 'त' प्रत्यय न वापरता स्थान दर्शवले जाते.) जर 'त' चा स्थानदर्शक उपयोग सर्वच ठिकाणी झाला असता तर कदाचित तुमचे समर्थन मला पटले असते, पण तसे नसल्याने तुमचे समर्थन पटत नाही.
आता मी दिलेल्या उदाहरणांबद्दल: कित्येक धार्मिक कार्यांमध्ये अजूनही गंध लावायची प्रथा आहे, तसेच अंगावर शाल/पांघरुण पांघरणे हा देखील प्रचलित प्रयोग असून 'अंगावर मायेची शाल पांघरणे' हा तर लोकप्रिय वाक्प्रचार आहे. घोडदौडीसंबंधित लिखाणात 'जीन कसणे' सर्रास वापरला जाणारा प्रयोग आहे. ( आणि माझी खात्री आहे कि डोक्याला अजून ताण दिला तर अशी आणखी काही उदाहरणे मी देऊ शकेन.) ही उदाहरणे तुम्हाला कदाचित प्रचलित वाटत नसतील, पण याचा अर्थ ती प्रचलित नाहीत असे नाही. त्यांवर विचार करायचा की नाही हा संपूर्णपणे तुमच्या ईच्छेचा प्रश्न आहे.
सारांश काय, की मराठीत योग्य पर्याय उपलब्ध असताना चुकीचे प्रयोग वापरुन त्यांचे समर्थन करणे मला पटत नाही. तसेच, या एका मुद्द्याचे मी माझ्याकडून पुरेसे स्पष्टीकरण केले आहे असे मला वाटते. तेव्हा काही नवीन दृष्टीकोन/आक्षेप मांडला गेला नाही, तर हा एकच मुद्दा मी पुन्हा उगाळणार नाही. :)