Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
कधी कधी सहज चाळा म्हणून केलेल्या गोष्टीचे रुपांतर गंमत मग लाज, वेदना, असहायता ह्यामध्ये कसे बदलते पाहा. झाली असतील चौदा-पंधरा वर्षे. माझे ऑफिस आठव्या मजल्यावर लिफ्टच्या बाजूला होते. बहुतेक सगळ्याच मजल्यावर लिफ्टच्या बाजूला पब्लिक फोन टांगलेले. त्यातले अनेक बरेचदा ऑउट ऑफ देवाणघेवाणच असत. सुदैवाने हा आठवा मजल्याचा फोन मात्र कायम जिवंत. त्यावेळी सेलफोन हा प्रकार अगदी तुरळक. सरकारी नोकरांकडे तर नाहीच. पब्लिक फोनचा वापर समस्त जनता नेमाने करी. तर हा ठणठणीत सखा बऱ्याच लोकांना माहीत झालेला. त्यामुळे कायम गुंतलेला. सकाळपासून लोक हजेरी लावत. अनेकदा तर रांग लागे मग आम्ही आठव्या मजल्यावरचे लोक ...