चक्रपाणि,
नमस्कार

दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
......
सापट म्हणजे फट.
......
'दाराच्या सापटीत / फटीत बोट चेंगरेल ', अशा आशयाचे वाक्य तुमच्या कानांवरून गेलेले असेल कदाचित.

या शेरातून असे काहीसे मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे -

आपले सारे जगणेच आता सापटीसारखे बनत चालले आहे. पूर्वीसारखे ते मोकळेढाकळे, मोठे, विशाल (तसेच संथ-शांत-निवांत) राहिलेले नाही. त्याचा संकोच होत चालला आहे; त्यात संकुचितपणा घुसला आहे.... वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे / आक्रमणे जगण्याला कुठल्यातरी सापटीत चेपत चालली आहेत. पर्यायाने त्या सापटीपुरतेच मर्यादित आपले जगणे होत चालले आहे. जणू काही सापटच! या संकुचितपणाच्या सापटीत हा जन्म, हे आयुष्य सापडण्याआधीच (जसे दाराच्या सापटीत बोट सापडते तसे! ) इथून निसटलेले बरे...

असे काहीसे मला या शेरातून म्हणायचे होते... :)

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.