'एकूण वाहनांच्या ३० टक्के वाहने ही ट्रक आहेत' आणि 'एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डीझेलवर चालणारी आहेत' हे 'कोड्या'त स्पष्टपणे दिलेले आहे की! बाकी सगळा निव्वळ शब्दांचा कचरा आहे.
तर आता या माहितीच्या आधारावर उत्तराचा प्रयत्न करून बघतो. ३० अधिक २० म्हणजे किती? हम्म्म्म्म्...... साधारणतः ४९ टक्क्यांपेक्षा जास्त पण ५१ टक्क्यांपेक्षा कमी असावेत. (याहून अचूक उत्तर हवे असल्यास कसोशीने प्रयत्न करून पाहावा लागेल. तो करण्याचा कंटाळा करतोय. तेवढी गरज असेलच तर सांगा, करून बघतो.)
(अधिक विचार केला असता हे उत्तर साधारणतः ४९.९९९९९ टक्क्यांपेक्षा अधिक परंतु ५०.००००१ टक्क्यांपेक्षा कमी एवढ्या पल्ल्यात सापडावे असे वाटते.)
उत्तराची साधारण दिशा कितपत बरोबर आहे ते कळवावे म्हणजे अधिक अचूक उत्तरासाठी - तशी गरज भासल्यास - प्रयत्न करता येईल.