ठीक आहे. मग शाब्दिक कचरा नसला तरी शाब्दिक गोंधळ आहे.

"पण बाबा, आपले १५ ट्र्क आणि एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत म्हणजे सुनील ला ती सगळी नकोच असणार ?? "  याचा अर्थ "आपले १५ ट्रक आहेत" आणि "२० टक्के वाहने डिझेलवर चालतात" असा घेतला, आणि "३०० वाहनांचे ३० टक्के ट्रक म्हणजे १५ ट्रक होत नाहीत" हे पडताळून पाहण्याचा (परीक्षेसाठी सोडवत नसल्यामुळे ) आळस केला, त्यामुळे गडबड झाली. (थोडक्यात, ट्रकही डीझेलवर चालतात/चालू शकतात हे विसरलो.)

मग आता फिरून प्रयत्न करतो.

३००च्या ३० टक्के ट्रक म्हणजे ९० ट्रक आहेत, पैकी १५ डीझेलवर चालतात. (म्हणजे ९० - १५ = ७५ हे इतर इंधनांवर - पेट्रोलवर? - चालतात.)

३००च्या २० टक्के म्हणजे ६० वाहने डीझेलवर चालणारी आहेत, पैकी १५ ट्रक आहेत. (अर्थ बरोबर घेतला का?) म्हणजे ६० - १५ = ४५ वाहने ही डीझेलवर चालतात पण ट्रक नाहीत.

आता हे प्रकरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत.

पहिली पद्धतः
सुनीलला नको असलेली वाहने = डीझेलव्यतिरिक्त इतर इंधनांवर चालणारे ट्रक + डीझेलवर चालणारी (ट्रक धरून) सर्व वाहने = ७५ + ६० = १३५.

दुसरी पद्धतः
सुनीलला नको असलेली वाहने = सर्व (म्हणजे कोणत्याही इंधनावर चालणारे) ट्रक + डीझेलवर चालणारी पण ट्रक नसलेली सर्व वाहने = ९० + ४५ = पुन्हा १३५.

थोडक्यात सुनीलला नको असलेली वाहने = १३५, म्हणजे सुनीलला चालू शकतील अशी वाहने = ३०० - १३५ = १६५. ही सर्वच्या सर्व सुनीलला मिळणार असे वाटते. (कोड्याच्या शब्दांत या बाबतीत नेमके काय घडले याबद्दल थोडा गोंधळ आहे. "त्यावर सर्वानी विचार केला आणि ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने एकूण वाहनांच्या किती टक्के आहेत ते शोधून काढले, तितकी टक्के वाहने सुनील ला मिळाली आणि तो खुष झाला." म्हणजे सुनीलला ट्रक आणि डीझेलवर चालणारी - म्हणजे थोडक्यात सुनीलला नको असलेली - सर्व वाहने मिळाली, आणि तो खुष झाला??? की त्याला ट्रक आणि डीझेलवर चालणारी वगळून बाकीची सर्व वाहने मिळाली आणि म्हणून तो खुष झाला? मी तरी ही दुसरी शब्दरचना अभिप्रेत होती आणि पहिली चूकून पडली असे गृहीत धरले. नाहीतर कार्यकारणभावात गोंधळ होतो. दुसरी रचना अनिलच्या दृष्टीने अन्याय्य आणि सुनीलची मनमानेलशाही चालवणारी असली तरी मनासारखी वाहने मिळण्याच्या आणि खुष होण्याच्या कार्यकारणभावाच्या बाबतीत तर्कसुसंगत वाटते.)

म्हणजे सुनीलला १६५ म्हणजे एकूण वाहनांच्या (म्हणजे ३००च्या) ५५ टक्के वाहने मिळाली.

(यात त्रैराशिक नेमके कोठे मांडावे लागले हा विचार करत होतो. मग लक्षात आले की १६५ हे ३००चे किती टक्के हे तोंडी हिशेबाने सहज सोडवण्यासारखे असले, तरी त्यात त्रैराशिक अध्याहृत आहे. असो. या कोड्याचा त्रैराशिकापेक्षाही वेन आकृती किंवा वेन डायाग्राम या प्रकाराशी - पुन्हा कदाचित अध्याहृत - संबंध आहे असे वाटते.)

आता ठीक?