पल्लवी प्रयत्न केलाय, लागलीच सांगून टाक गं उत्तर बरोबर/चूक आहे का ते.
एकूण वाहने ३००
त्यात ३०% ट्रक म्हणजे - ९०
डिझेलवर चालणारे ट्रक -१५
एकूण वाहनांच्या २०% वाहने डिझेलवर चालणारी म्हणजे - ६० ( ह्या ६० मध्ये हे १५ ट्रकही आले)
म्हणजे २०% वाहने सुनीलला मिळाली. ( हे काही न मांडताही प्रश्नातच उत्तर दिल्यामुळे मिळू शकेल असे वाटले. )
( ट्रक हे एकूण वाहनांमधून वगळलेले नाहीत हे गृहीत धरले आहे. पण जर प्रश्न समजण्यात चूक झाली असेल आणि ट्रक वेगळे व इतर वाहने वेगळी असे समीकरण असेल तर मात्र सुनीलला २५% म्हणजे ७५ वाहने मिळतील. )
अवांतर: पण मग उरलेल्या वाहनांचे काय? ( उगाच उत्सुकता...)