"पण बाबा, आपले १५ ट्र्क आणि एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत म्हणजे सुनील ला ती सगळी नकोच असणार?? "
एकूण वाहनांच्या २० % = ६० वाहने डिसेल वर चालतात.
यात १५ ट्रकही येणार. म्हणजे ४५ + ९० = १३५ इतकी सुनीलला नको असलेली वाहने होतात.
म्हणजे उत्तर ४५ टक्के.
पण १५ ट्र्क 'आणि' एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत असे घेतले तर
१५ + ६० + (९० - १५) = १५० ही सुनीलला नको असलेली वाहने होतात.
म्हणजे उत्तर ५० टक्के.
मला वाटते तुम्हाला "आपले १५ ट्रक धरून एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने" असे म्हणायला हवे.
जिथे 'एक आणि एकच' उत्तर अपेक्षित असते, तिथे शब्दयोजना अचूकच हवी.
तुमचे काय मत आहे?