अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काही माणसे दुसर्यांना कांहीना काही देत रहाण्यासाठीच बहुदा जन्म घेतात. आजींचे काहीसे असेच असावे. आजींनी आयुष्यभर दुसर्यांना भरभरून दिले व देत राहिल्या. त्यांचा हात नेहमी उपडाच व मिटलेलाच राहिला. त्यांनी हाताची ओंजळ कधीच पसरली नाही. मुले, नातवंडे,बहिणी,भाचरे यांना तर त्यांनी दिलेच पण परिचित आणि अगदी घरचा विश्वासू गडी माणूस सुध्दा त्या कधी विसरल्या नाहीत. त्यामुळेच की काय त्यांची झोळी परमेश्वराने कधीच रिकामी ठेवली नाही. आजी आयुष्यभर दुसर्यांना देत गेल्या पण त्यांनी घेणार्याला कधी कमीपणा वाटू दिला नाही. गरजू असो किंवा संपत्तीच्या राशीवर लोळणारा असो, त्याला नेहमीच " हे मला आजींनी दिले." हे अभिमानानेच सांगता आले. कोणाला गरज आहे हे आजींना बरोबर उमगे. कोणाचा विमा थकलेला असो, कोणाला नवीन धंदा चालू करण्यासाठी बीज भांडवल हवे असो किंवा नातवाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी मदत हवी असो, आजींनी कधी गरज भागवली नाही असे झाले नाही. ...
पुढे वाचा. : आजी