जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्रातील गड आणि किल्ले आपले सांस्कृतिक वैभव असून तो इतिहासाचा मोठा ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यात विविध ठिकाणी भुईकोट, सागरी किल्ले बांधले. काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. महाराजांनी बांधलेल्या/खास बांधून घेतलेल्या किंवा कोणाकडून जिंकून घेतलेल्या या सर्व किल्ल्यांची व्यवस्था, त्यांनी उत्तम ठेवली होती. योग्य प्रकारे त्यांची निगा राखण्यात येत होती. आज काही अपवाद सोडले तर या सर्व गड व किल्ल्यांची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. स्वयंसेवी आणि इतिहासाबद्दल प्रेम असणारी मंडळी आपल्या परीने त्यांची काळजी घेत आहेत. खरे तर राज्य शासनाकडून हे काम अधिक जोमाने होणे गरजेचे आहे. मात्र शासनाला भर समुद्रात तीनशे कोटी रुपये खर्च करून शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधायला पैसे आहेत परंतु त्यांचे जीवंत स्मारक असलेल्या या गड-किल्ल्यांच्या डागडुजीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पैसे नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. शिवाजी महाराज ...