दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

Close...

आरोग्याच्या रक्षणात, संवर्धनात अन्न अव्वल स्थानी आहे. अन्नाद्वारे आरोग्य संतुलित ठेवता येते तसेच त्यानेच रोगही ओढावून घेतला जाऊ शकतो. त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या संस्कार, संयोग, संतुलन या संकल्पना समजून घेणे आवश्‍यक आहे.
संस्कारांमध्ये इतकी ताकद असते की त्यामुळे एकच पदार्थ संस्कारापरत्वे वेगवेगळ्या गुणांचा बनू शकतो. गहू जरी एकच असला तरी त्याच्यापासून बनवलेली घडीची पोळी, फुलका आणि पराठा यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. फुलका पातळ असून प्रत्यक्ष निखाऱ्यावर भाजला जात असल्याने पचनास अतिशय हलका असतो. घडीच्या पोळीत घडी बनवताना तेल किंवा तूप लावले जात असल्याने पोळी स्निग्धता देणारी असून पचायला फार हलकी नसते किंवा फार जडही नसते. पराठा मात्र जाड लाटलेला असून तेल किंवा तूपावर भाजला जात असल्याने स्निग्धता देत ...
पुढे वाचा. : "अन्नाद्‌ भवन्ति भूतानि''