पल्लवी,

४५% वाहने सुनीलला मिळालीत का हो?

स्पष्टीकरण:

एकूण वाहने = ३००

एकूण वाहनांच्या ३० टक्के इतके ट्र्क शोरूम मध्ये आहेत, म्हणजे,

एकूण ट्रकस् = (३००*३०)/१०० = ९०

एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत, म्हणजे,

एकूण डिसेल वर चालणारी वाहने = (३००*२०)/१०० = ६०

सुनीलला ट्रकस आणि दिसेल वर चालणारी वाहने नको.

म्हणजे, सुनीलला न चालणारी वाहने = एकूण ट्रकस् + एकूण डिसेल वर चालणारी वाहने  --------  (समजा)

आता, अनिलच्या म्हणण्यानुसार '१५ ट्रकस् आणि एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत'

हे १५ ट्रकस्, 'एकूण ट्रकस्' आणि 'एकूण डिसेल वर चालणारी वाहने' या दोन्ही संचात आहेत. संचाच्या नियमांनुसार (सेट थियरी),

दोन्ही संचातील सामयिक भाग(या संदर्भात वाहने) = १५

सुनीलला न चालणारी वाहने = एकूण ट्रकस + एकूण डिसेल वर चालणारी वाहने - दोन्ही संचातील सामयिक भाग(वाहने)

सुनीलला न चालणारी वाहने = ९०+६०-१५ = १३५

सुनीलला न चालणारी वाहने(%) = (१३५*१००)/३०० = ४५%

ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने एकूण वाहनांच्या किती टक्के आहेत ते शोधून काढले, तितकी टक्के वाहने सुनील ला मिळाली आणि तो खुष झाला.

म्हणजे सुनीलला ४५% वाहने मिळाली.

(एवढी खटाटोप करून उत्तर बरोबर असेल तर मिळवले, नाहीतर......    )