kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
आपण कसे आहोत, यापेक्षा आपण कसे दिसतो याचीच चिंता बहुतेकांना असते. म्हणजेच आपण कसे असावे यापेक्षा आपण कसे दिसावे याचा विचार अधिक केला जातो. हे ‘दिसणे’ म्हणजे केवळ चेहरा नव्हे, किंवा नुसते शारीरिक दिसणे नव्हे. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने आहेत, ब्युटी पार्लर्स आहेत, जिम आहेत, फॅशन डिझायनर्स, फॅशन्स आणि कॉश्च्युम डिझायनर्स आहेत. ज्यांना हे ‘हायटेक’ परवडत नाही त्यांना सहज उपलब्ध असलेली क्रीम्स, लोशन्स, टाल्क वगैरे आहेत.
आपल्या समाजातील किमान ३०-३५ टक्के स्त्री- पुरुषांना/ मुला- मुलींना ते ‘दिसणे’ही परवडत नाही। तरीही समाजाच्या कोणत्याही वर्गात आपण कसे आहोत, त्यापेक्षा आपण कसे दिसावे याबद्दलच जास्त विचार होत असल्यामुळे कॉस्मेटिक्स, परफ्यूम्स, फॅशन्स या उद्योगावर आर्थिक मंदीचा फारसा परिणाम झालेला नाही. ग्राहकांच्या संख्येत- विशेषत: दाग-दागिने (खरे वा खोटे) खरेदी करणाऱ्यांची संख्याही तितकी कमी झालेली नाही. सोन्या-चांदीचे भाव मंदीच्या काळातही वाढतच होते. फक्त श्रीमंत लोकच सोने खरेदी करतात असे नाही. मध्यमवर्गीय आणि गरिबांमध्येही सोने-चांदी खरेदी करण्याची ओढ आणि आस असतेच. सोने जसा आर्थिक आधाराचा भास देते, तसेच दागिन्यांमुळे ‘दिसण्या’चाही भास देते. मार्शल मॅक्युहान या मीडिया पंडिताने म्हटले होते की आरसा नसता तर सौंदर्यप्रसाधने निर्माणच झाली नसती! आरशात पाहून आपण कसे दिसतो हे लक्षात आल्यावर आपण कसे दिसावे हे वाटू लागले आणि ‘कॉस्मेटिक्स’ जन्माला आली. परंतु येथे आरसा हे रूपक आहे. आपाल खरा स्वभाव आणि ‘पर्सनॅलिटी’ स्वत:पाशी ठेवून लोकांमध्ये आपली प्रतिमा व व्यक्तिमत्त्व कसे दिसावे याचा प्रयत्न म्हणजे ‘पर्सनॅलिटी मेकओव्हर’!बाह्य़ सौंदर्याला जसजसे महत्त्व प्राप्त होत गेले, तसतसे भांडवलशाहीतील ‘अनावश्यक’ वस्तूंचे ‘फॅड’ही वाढत गेले. आपल्या वेशभूषेवरून, चेहऱ्यावरून, वागण्यावरून म्हणजेच आपण कसे दिसतो यावरून लोकांनी आपल्याबद्दलचे मत ठरवावे असे जेव्हा लोकांना वाटू लागले तेव्हा भांडवलशाहीचा विस्तार झपाटय़ाने होऊ लागला.अगदी निखळ जीवनावश्यक गोष्टीच आपण वापरल्या/ खरेदी केल्या असत्या तर बाजारपेठेचा विस्तार झाला नसता आणि त्याबरोबर आलेली नवी ‘दिसण्या’ची मूल्येही निर्माण झाली नसती. जगातली सुमारे ४० टक्के ...
पुढे वाचा. : एक चेहरे पे कई चेहरे (त्रिकालवेध)