Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
रतन टाटा यांच्या स्वप्नातली ‘नॅनो’ आता लवकरच रस्त्यावर धावू लागणार आहे. गेल्या वर्षीच्या ‘अॉटो-एक्पो’मध्ये जगासमोर सादर केलेल्या या सर्वांत स्वस्त कारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एक लाखांची कार म्हणून भारतात आणि अडीच हजार डॉलरमधली कार म्हणून जगात प्रसिद्धी मिळवलेल्या या कारच्या बुकिंगला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नक्कीच मिळाला नाही. आज (२५ एप्रिल) ‘नॅनो’च्या बुकिंगचा शेवटचा दिवस. उद्या याबाबतची अधिकृत माहिती बाहेर येईलंच. पण आता उपलब्ध असलेली माहिती मात्र फारशी उत्साहवर्धक नाही.
‘टाटा नॅनो’ला मिळालेली प्रसिद्धी पाहता देशभरातून किमान १० लाख लोक ‘नॅनो’ बुक करतील, अशी कंपनीची अपेक्षा होती. या अपेक्षेनुसार कंपनीने देशभरात सुमारे तीस हजार आऊटलेट्समधून बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक आऊटलेटमध्ये जादा फॉर्म्सही पुरविण्यात आले होते. नॅनोच्या बुकिंगसाठी रांगा वगैरे लागतील, अशा कदाचित कंपनीची अपेक्षा असावी. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. गाडीची चौकशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येऊन गेले; पण त्यातील खूप कमी जणांनी गाडी बुक केल्याची माहितीही अनेक ...
पुढे वाचा. : ‘नॅनो’चं ‘नॅनो बुकिंग’!