kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
भव या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, भाजपा तसेच तिसऱ्या आघाडीतील छोटे-मोठे पक्ष यांच्या आघाडय़ांची सतत मोडतोड होत आहे. निवडणुकीनंतर तर या प्रक्रियेला आणखीनच वेग प्राप्त होणार आहे. देश एका भन्नाट भोवऱ्यात सापडणार आहे. संख्याबळाची उलटसुलट गणितं जुळवूनही कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन करणे अशक्य आहे. जरी स्वार्थी जुळवाजुळवीतून एखादं कडबोळं सरकार बनलं तरी ते फार काळ टिकणार नाही। तेव्हा अशा प्रकारच्या संपूर्ण मोडतोडीतूनच कदाचित पुढच्या काळात स्थिर सरकार येऊ शकेल अशी शक्यता दिसते। अाणखी महिन्याभरानंतर भारताचे राजकारण एका भन्नाट भोवऱ्यात सापडणार आहे। हे भाकित करण्यासाठी आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीकडे पाहण्याची गरज नाही. कारण आपल्या देशाच्या राजकारणात वाहणाऱ्या अंत:प्रवाहांनी आता चक्रीवादळी रूप धारण केले आहे. निवडणूक काळात भासणारी वरवरची शांतता ही त्या वादळापूर्वीची आहे.सर्वसाधारणपणे वादळाची॥ झंझावाताची सूचना हवामान खात्याकडून जेव्हा मिळते, तेव्हा त्या सूचनेचा उद्देश लोकांनी त्याकरता आपली मानसिक तयारी करून, शक्यतो ज्या गोष्टींच्या सुरक्षेची काळजी घेता येईल, त्याची घ्यावी, असा इशारा देण्यासाठी ती केलेली असते. या लेखाचा उद्देशही तोच आहे.याच स्तंभातून आम्ही ‘अराजकाचे पर्व’ आणि ‘काऊंटडाऊन’, तसेच ‘स्फोटक स्थितीतील भारतीय उपखंड’ या विषयांवरचे लोकांना ‘सावध’ करणारे लेख गेल्या वर्षभरात प्रसिद्ध केले आहेत. दुर्दैवाने त्यातील बहुतेक ‘भाकिते’ खरी ठरली. वस्तुत: ती ‘भाकिते’ नव्हती, तर धोकादायक शक्यता वर्तविलेल्या होत्या! चिनी भाषेत एक म्हण आहे- ‘जे जे विपरित घडू शकते, ते प्रत्यक्षातही घडतेच!’ तसे पाहिले तर ही म्हण नियतीवादी आणि निराशावादीही आहे. परंतु या म्हणीच्या अनुषंगानेच आणखीही एक सुविचारसदृश चिनी संकल्पना आहे. ती अशी- ‘जे मोडकळीला आले आहे, ते पूर्णपणे मोडल्याशिवाय नवी उभारणी करता येत नाही.’ (विनाशातच नवनिर्मितीची बीजे असतात- ही विश्वमान्य संकल्पना त्यातूनच आली असावी.) अर्थातच या ठिकाणी आपण ‘विनाशा’चा विचार करीत नसून, मोडकळीला आलेली इमारत पाडून त्याच जागी अधिक ‘एफएसआय’ वापरून नवीन बिल्डिंग बांधण्याचा विचार करीत आहोत. हे राजकीय बांधकाम आहे. ते बांधकाम करण्याची संधी या भन्नाट राजकीय भोवऱ्यामुळे आपल्याला मिळणार आहे.लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर होतील. त्या रात्रीच सर्व राजकीय पक्षांची नेते ...
पुढे वाचा. : भन्नाट भोवऱ्यात भारत (लोकरंग)