आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
सोळाव्या शतकात सत्य आणि स्वप्नाचा चांगलाच ऊहापोह करणारा आणि स्वतःचं अस्तित्व सोडून जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल शंका उपस्थित करणारा तत्ववेत्ता देकार्त हा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना तर परिचित आहेच, पण त्याचं केवळ आपली विचारशक्ती ही आपल्या अस्तित्त्वाचा पुरावा मानणारं वचन (आय थिंक, देअरफोर आय अॅम) हे कोणत्या ना कोणत्या संदर्भात आपल्यातल्या अनेकांच्या कानावर पडलेलं आहे. देकार्तच्या विचारांचा आधार घेणारा, पण इतरच कारणांसाठी चर्चेत राहिलेला सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे मेट्रिक्स, पण त्याखेरीज इतरही अनेक चित्रपट याच कल्पनांवर बेतले गेले. त्यातले काहीतर त्याच सुमारास प्रदर्शित झाले. यातलाच एक होता आलिआंद्रो अमीनाबार या दिग्दर्शकाचा स्पॅनिश चित्रपट ओपन युअर आईज.
ओपन युअर आईज चित्रपट सुरु होतो, तो कोणीतरी पुटपुटलेल्या ओपन युअर आईज याच वाक्याने. मग आपल्या लक्षात येतं की, हे वाक्य म्हणजे एका बोलक्या ...
पुढे वाचा. : ओपन युअर आईज- चकवा