दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

मायदेशातील नोकरी आणि सहकारी यांचा अनुभव गाठीशी ठेवूनच अमेरिकेत आले. नोकरी अंगात भिनलेली होतीच. परवाना हातात मिळताच एका विमा कंपनीत नोकरी धरली. पहिले काही दिवस कुतूहल, नवीन सहकारी आणि थोडे दडपण असे गेले. हळूहळू मी रुळले. आमच्या सेक्शन मध्ये सगळा बायकांचा कारभार होता. अगदी सुरवातीला एक मुलगा होता पण ह्या गोकुळाला कंटाळला अन जो गेला पळून तो एकदम त्याने फ्लोरिडाच गाठले. मग काय आनंदीआनंद.

सेक्शनची हेड होती, बार्बरा: साठीच्या आसपास. चांगलीच स्थूल. वजनामुळे गुडघे तिला त्रास देत. पेसमेकर लावलेला असल्यामुळे ती नेहमीच मोठ्यामोठ्याने श्वास घेत असे. नवीन असताना मी खूप घाबरून जाई, वाटे हिला कधीही काही होईल. पण ही बाई एकदम बिनधास्त. दर दोन तासाने दहा मिनिटे गायब-सिगरेट फुंकायला. आली की पुढची पंधरा मिनिटे मी तिच्या आसपासही फिरकत नसे. मनाने ही मोकळी होती. नवऱ्याला शिव्या घालणे हा तिचा आवडता उद्योग. हा तिचा तिसरा नवरा. फारच रागावली तर आधीच्या दोघांचाही जाहीर उद्धार. ...


पुढे वाचा. : माझ्या अमेरिकन सख्या