काल महामानवाची जयंती झाली।
.
तत्कालीन समाजाने लाथाडलेल्या पतितांना सामाजिक विषमते विरुद्ध अखेरपर्यंत लढत देत धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नती साठी आकाशपाताळ एक करणाऱ्या "जीवनाचा" हा जन्म दिन। आंबेडकरांच्या शब्दरुपी असलेल्या जीवनपटावर, विचारांवर, विद्वत्तेवर, व्यासंगावर, बुद्धिजिवीपनावर, त्याचबरोबर निर्दोष असूनही जन्मदोष देत मिळालेल्या विटंबनेवरून आठवणींचा प्रकाशझोत फिरवण्याचा हा दिवस.... पण प्रत्यक्षात संध्याकाळी नशेत तर्र होवून नाचणारी अनुयायी मंडळी पाहिली आणि हि "रिपब्लिकन चळवळ" नेमकी उलट दिशेने चालली आहे ह्याची खात्री झाली.
पुढे वाचा : महामानवाची जयंती