अमेरिकेतील मुलाचा फोन त्याच वेळी आला होता. त्याला हा अनुभव सांगितल्यावर अमेरिकेत काही ज्येष्ठ नागरिक   वाहन चालवू शकत नाहीत त्यांना चालत जाऊन मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून मतदानकेंद्र चालत जाण्याच्या अंतरावरच असते असे त्याने सांगितले. यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. वारीच्या शेवटच्या भागावर एका मनोगतीची "पुरे झाले अमेरिकेचे कौतुक आता भारताविषयी काहीतरी लिहा" असा प्रतिसाद आला, पण भारताविषयी काही लिहायचे असेल तर हे असे लिहावे लागते याहून दुर्दैव ते कुठले ?