पण मला ही वर्गवारी इतकी रुजली आहे हे पाहून धक्का बसला. भौगोलिक स्थानावरून माणसाची बुद्धीमत्ता आणि हजरजबाबीपणा ठरत असेल असे मला वाटत नाही. ज्याप्रमाणे पुण्यात राहणारे सर्वच लोक विद्वान, बुद्धीमान, इरसाल आणि चोखंदळ असू शकत नाहीत त्याप्रमाणेच इतर (तथाकथित मागास) भागातले सगळेच लोक मंद असत नाहीत.