आर्येचे लक्षणच असे आहे की-
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा)
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८, चौथ्यात १५ )
असे असल्यानेच आमच्या शिक्षिका आर्येला पायमोडके वृत्त असे मजेने म्हणायच्या.
गीती आणि उपगीतीचे लक्षण देत आहे.
आर्योत्तरार्धतुल्यं प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत्
छन्दसि ताम् 'उपगीतिं'प्रकाशयन्ते महाकवयः ।
(आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण )
आर्यापूर्वार्धसमं द्वितीयमपि यत्र भवति सा 'गीति:' ।
(आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण )
त्यामुळे, मूळच्या आर्येच्या लक्षणांवरूनच ह्या दोहोंची लक्षणे सांगितलेली असल्यामुळे, त्यातील साधर्म्यामुळे गिती, किंवा उपगीतीला आर्या समजण्याचा घोळ होऊ शकतो.
- चैतन्य दीक्षित.