काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


आजपर्यंत तामिळ टायगर्सचा दुःस्वासच करित आलोय. ते टेररिस्ट ऍक्टीव्हीटीमधे इन्व्हॉल्व्ह्ड आहेत म्हणुन त्यांच्या नावाने काड काड बोटं मोडणं सुरु असतं माझं. बरेचदा एका बाजुचीच  माहिती असते आपल्याला, किंवा एखाद्या गोष्टीमागची पार्श्वभुमी माहित नसते , त्या मुळे आपण एकांगी विचार करतो, आणि एखाद्या गोष्टी बाबतचे आपले मत  बनवतो.आता वाट्तंय माझी चुक तर होत नव्हती नां? ह्या प्रॉब्लेम कडे पहातांना??

तामिळ  लोकं.. तसे भांडकुदळ नाहीत. किंवा फार ऑफेन्सिव पण नाहीत. मग श्रीलंकेमधेच ते इतके ऑफेन्सिव्ह कां झालेत? आजपर्यंत टायगर्सने कित्येक राजकिय नेत्यांना मारलंय, बॉंबस्फोट घडवुन आणले. कित्येक तामिळ लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं.. ह्या तामिळ लोकांना हवंय तरी काय़? आत्ता पर्यंतच्या वाचनावरुन असं दिसतं की त्यांना श्रीलंकेचं विभाजन हवंय.. एक थोडासा तुकडा त्यांना वेगळा देश म्हणुन हवाय. अशा मागणिचे कारण? ते समजुन घ्यायला थोडा इतिहास बघावा लागेल.

 ... पुढे वाचा. : श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)