दुसरा शेर उत्तम आहे.
मतल्याबाबत एक सूचना करावीशी वाटते-
मी जसा नाही तसे मी व्हायचे होते कुठे?
यामध्ये कवी असे म्हणतोय की मी जसा नाही, तसे मला कधीच व्हायचे नव्हते. याचा अर्थ आता मी जसा आहे, तएच होणे मला अपेक्षीत होते.
आणि पुढची ओळ-
चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?
दोन्ही ओळी (अर्थाच्या दृष्टीने) परस्परांना छेद देतात, असे मला वाटते.
मी जसा आहे तसे मी व्हायचे होते कुठे?
चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?
असा बदल अधिक योग्य ठरावा.