धाय म्हणजे हंबरडा.  मोकलणे म्हणजे मोकळा करणे. त्यामुळे धाय मोकलून रडणे म्हणज हंबरडा दाबून न ठेवता मोकळा करून मोठ्याने रडणे.

मी म्हणणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व दाखवणे, जोरात असणे.  ऊन मी म्हणत होते अर्थात आपण जोरात असल्याचे दाखवीत होते.

पाचावर धारण बसली. रुपयाला पाच शेर धान्य मिळणे, म्हणजे भयंकर महागाई.