वाद प्रतिवाद, मुद्दे-गुद्दे, टक्के-टोमणे आणि हत्ती-कुत्रे.... ही चर्चा वाचून करमणूक झाली.
मी पक्की मुंबईकर याचा मला अभिमान आहे. (कोणी काही म्हणो. )
जीवनमान: मुबंईचे आयुष्य वेगवान, उत्सफुर्त, बेधूंद आहे. रोजची धावपळ ही आमची "अगतिकता" नाही. वेगवान, गतिमान जीवनशैली मुबंईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. चित्त्याला त्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर त्याची चाल गतिमान, चपळच हवी.
वातावरण: पुण्याच्या तुलनेत जगण्यास सुसह्य.
अंतरे: वेगवान लोकल त्यामुळे दूरचा प्रवास कमी वेळात होतो.
मराठीपणा: कित्येक भाषिकांना सामावून घेणाऱ्या मुंबईत दैनदिन जीवनात मराठीपणा/ बाणा दाखवणे अव्यवहार्य ठरेल. मराठी सण-उत्सव फक्त मराठी बांधवांपूरते मर्यादीत न राहता परधर्मीय, अमराठी लोकही आनंदाने सहभागी होऊन साजरा करतात. यापेक्षा जास्त आनंद काय असू शकेल?
बुद्धी: हि काही प्रादेशिक लोकांची ठेकेदारी नाही. बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? ते स्पष्ट करावे. एखाद्याला तिरसट उत्तर देउन त्याच तोंड बंद करायच म्हणजे बुद्धिमत्ता असेल तर, माफ करा! त्याबाबतीत आम्ही मुबंईकर "ढ" असलेलेच बरे. बहुतांशी मुबंईकरांना वादविवाद, चर्चा यात रस नसतो. शाब्दिक चढाओढीपेक्षा "आपण भले, आपले काम भले" ही वृत्ती असते.
स्वच्छता, साहित्यप्रेम: पुण्यापेक्षा कमी हे मान्य.
चोखंदळपणा: ही तर वैयक्तिक बाब आहे. याउलट मुबंईतील बाजारपेठेत वस्तुची उपलब्धता, पर्याय पुण्यापेक्षा जास्तच आहे.
वेळेची उपलब्धता (हा हा ):???? माझ्या माहितीप्रमाणे मुंबईकर असो किंवा पुणेकर सर्वांना दिवसाचे २४ तासच उपलब्ध असतात ना?
सुरक्षितता: २४ तास जाग्या असणाऱ्या मुबंईत रात्रीचा प्रवासही बाकी शहरांच्या तुलनेत सुरक्षित आहे.
माणूसकी: सर्वधर्म समभाव, सांस्कृतिक आदान-प्रदान, सहिष्णुता, सांमजस्य ही मुंबईच्या संस्कृतीने प्रत्येक मुंबईकराला दिलेली अमुल्य ठेव आहे. माणूसकी, एकोपा याबतीत तरी मुंबई आदर्श आहे.
माझा वैयक्तिक कोणत्याही शहरावर रोष नाही. या उलट पुण्याचे आकर्षण आहे. कारण मुंबईकरांचा नेहमीचा सरळपणा सोडून पुणेकरांचा इरसाल तिरसटपणा अनुभवायचा आहे. (खात्री बाळगा. तिरसट नाही पण तोडीस तोड, हजरजबाबी उत्तर देण्याची क्षमता मुंबईकरांतही आहेच) धन्यवाद..!!
काका एक विनंती : एकदा कोकणात जाऊन या. मग मुंबई-पुणे सगळं विसरून जाल.