धाय म्हणजे हृदय.  'धाय' हा शब्द कृ. पां. कुलकर्णीकृत व्युत्पत्ती कोशानुसार हृदय पासून बनला आहे. म्हणून धाय मोकलणे हृदय मोकळे करणे; खूप रडून घेणे; म्हणजेच हंबरडा फोडणे. दुःखाच्या प्रसंगी जर एखादी व्यक्ती  रडली नाही तर तिच्या मनावर प्रचंड ताण येण्याची व त्यातून अणखी काही अनर्थ ओढवण्याची शक्यता असते. ते होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीला मुद्दाम रडवले देखील जाते.