Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

ढापू बाई ढापू
गं ढापू बाई ढापू
एक बातमी ढापू
गं दोन लेख ढापू
कुणाला कळतंय?
दे ठोकून... छापू

हे पारंपरिक वृत्तपत्रीय लोकगीत असल्याचे सर्वश्रुत आहेच. वृत्तपत्रांचा लेलेकृत इतिहास निव्वळ चाळला, तरी अनेक श्रीयुतांनी हे गीत आळवल्याचे आपणांस दिसून येईल. आणि समस्तांस हे ज्ञातच आहे, की मराठी माणूस म्हटला की तो परंपराप्रिय असतोच. त्या कारणें समकालिन मराठी पत्रविश्वातही हे ढापू गीत ऐकावयास खासच मिळते. ज्याची सुरम्य उदाहरणे नेहमीच आपणांसमोर फडफडत असतात.

त्यातील एक ताजे टवटवीत तरल उदाहरण येथे उद्धृत करण्यायोग्य आहे.
ते वृत्त होते आमदारनिवासातील. एका मंत्र्याच्या पाहुणीस मंत्रीपत्नीने रात्रीच्या समयी चौदावे रत्न दाखविले, अशी ती रा. रा. सुकृत खांडेकरकृत सुरस व चमत्कारिक बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती. (वाचली होती ना तुम्ही ती बातमी... अगदी शेवटच्या पूर्णविरामापर्यंत? चवीचवीने?... तिचे पारायण करताना, भाव दाटले मनी अनामिक असे विचित्रसे काही होऊन आमच्याही नाडीचे ठोके वाढले ...
पुढे वाचा. : वृत्तढापूकला व शास्त्र