सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

की घेतले व्रत ............
सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. दि.म. संत सदा कार्यरत राहणारी ८२ वर्षीय व्यक्ती. बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते बालस्वयंसेवक होते. तरुणपणी नोकरी संभाळून संघाचे काम निष्ठेने केले. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. त्याविरुद्ध झालेल्या सत्याग्रहात त्याना चार महिन्यांचा तुरुंगवासही घडला.
कामावरची निष्ठा हा त्यांचा स्थायीभाव. सेवानिवृत्त झाल्यावर ते थोडेच स्वस्थ बसणार! बावीस वर्षांपूर्वी आयुर्विमा महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यावर विले पार्ले येथील गेली सत्याऐशी वर्षे अखंडितपणे
कार्यरत असलेल्या लोकमान्य सेवा संघ येथे त्यानी आपले समाजकार्य सुरू केले. त्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे वृद्धाश्रम, देहदान, नेत्रदान व त्वचादान यासंबंधी माहिती पुरविणे. लोकमान्य ...
पुढे वाचा. : की घेतले व्रत ...... की घेतले व्रत ............ की घेतले व्रत ............