शुद्ध मराठी,

आपला प्रतिसाद वाचून बरं वाटलं की चला, कुणालातरी 'चांगला अनुभव' सुद्धा आलाय. परंतु, त्याबाबतीत तुम्ही नशीबवान आहात असंच म्हणावं लागेल किंवा तुम्ही राहत असलेल्या शहराला 'स्वप्ननगरी' तरी म्हणत असावेत  

आमच्यासारखेच इतरांचे अनुभव असावेत.

हे तुम्हाला वाटतं हो... पण तसं नाहीये. यावेळी तरी मतदार यादीत नाव यावे याकरता मला शक्य ते आणि माझ्याकडून अपेक्षित असे सर्व काही वेळच्यावेळी केले. उपयोग... शून्य!!! (नाही म्हणायला मनस्ताप मिळाला...)