जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या सर्वानाच आकाशातील ग्रह, तारे याविषयी एक सुप्त आकर्षण असते. रात्रीच्या वेळी काळेभोर आकाश पाहणे आणि त्या आकाशात विविध ग्रह, तारे, नक्षत्रे शोधणे आणि ते पाहणे यात वेळ कसा जातो, ते कळत नाही. अर्थात त्यासाठी आकाशाची माहिती असणारा एखादा तज्ज्ञ आपल्याबरोबर असला पाहिजे. म्हणजे नेमकी माहिती आपल्याला कळू शकते. खगोलशास्त्र, आकाश, ग्रह-तारे, नक्षत्र आदींविषयी समग्र माहिती आणि ती सुद्धा मराठीतून असणाऱया एका संकेतस्थळाची ओळख मी आज करून देणार आहे. खगोलशास्त्रावरील मराठीतील हे पहिले संकेतस्थळ असून सोप्या व भरपूर चित्रे, आकृत्या, अॅनिमेशन पद्धतीने या विषयाची माहिती करून देण्यात आली आहे. www.avakashvedh.com असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे. ...
पुढे वाचा. : खगोलशास्त्राचा समग्र व सचित्र अवकाशवेध..