तसा जूनाच प्रश्न आहे. सहसा, धर्म हा देशापेक्षा मोठा मानला जातो. त्यामुळे राजकीय विषय कीतीही महत्त्वाचा असला तरी धर्मगुरू ती माहीती फोडणार नाहीत. आणि मुळात, कंफेशन करणारा हा धर्मगुरू मार्फत देवाकडे कंफेशन करत असतो. ही कन्सेप्टच वेगळी आहे. धर्मगुरू माणूसच आहे, त्याने देशाची वगैरे मदत केली पाहिजे ह्या गोष्टिंना काही थारा नाही. अर्थात, माझा ह्या विषयी फार अभ्यास नाही, इतिहासामध्ये एखाद्या राजकीय व्यक्तिने वगैरे धर्मगुरूचा अशाप्रकारे गैर वापर करून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.