ह्याला तर्कशास्त्राच्या (लॉजिक) परिभाषेत कसलीतरी फॅलसी म्हणतात. (काय ते पाहून सांगतो.) अशा प्रकारची आणखी काही उदाहरणे त्यात दिली आहेत.

उदा. गायीच्या मागे खाटीक लागला आहे पुढे दोन रस्त्यांपैकी एका रस्त्याने गेलेली गाय तुम्ही पाहिली आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? त्या गायीचा उपयोग संपला आहे म्हणून, ती अशक्त आहे म्हणून, खाटीकाच्या उपजिविकेसाठी गायीचे प्राण आवश्यक आहेत म्हणून खाटीकाला खरे सांगाल? की भूतदया म्हणून गायीचे प्राण वाचवाल?

त्यामुळे प्रश्नाचे एकमेव उत्तर देणे/असणे अवघड आहे, म्हणून परिस्थितीनुरूप, नुकसानाच्या/परिणामांच्या स्वरूपानुसार वागणे ह्या स्मिता ह्यांच्या मुद्द्याशी सहमत.