काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे ३ महीन्यापूर्वी नाव-नोंदणी केली. मतदार यादीत नाव होते. ( मतदार यादीत नाव बघितल्यावर रेल्वेच्या कोचच्या बाहेर नाव वाचल्यावर होतो त्याच्या १०० पट आनंद झाला! )
शाळा घराजवळच होती. लोकांनी वेड्यावाकड्या गाड्या पार्क केल्यामुळे अडथळ्याची शर्यत पार करतच आत जावे लागले.( हा दोष सरकारी यंत्रणेचा नाही. माय - बाप जनतेचा आहे) सरकारी अधिकारी अत्यंत चांगले होते. योग्य क्रमांक खोल्यावर लिहले होते. साक्षर आणि डोळे असणारा स्त्री- पुरुष कोणालाही न विचारता योग्य ठिकाणी पोहोचू शकत होता.
अत्यंत आनंददायी अनुभव! ( कोथरुड- महात्मा सोसा-एकलव्य कोलेज)
अर्थात , सगळ्यांना असा अनुभव आला नाही हे खरेच.
शेवटी मतदान हे "दान"नव्हे , कुणावर उपकार नव्हेत!
सडलेल्या राजकारणावर एक अत्यंत प्रभावी औषध आहे. आपल्याला ओषध घ्यायला आग्रह करावा लागतो का?
कदाचित दवाखाना फार चांगला नसेलही, रांग मोठी असेलही, प्रकरण त्रासदायक असेलही, पण माय-बाप हो , ओषध गुणकारी आहे , तेव्हा तुमचा नंबर तुमचा तुम्हीच लावला पाहिजे. ३ वेळा विचारून खात्री केली पाहिजे. आत्तच तयारी करा, काय माहीती पुढची निवडणूक केव्हा येईल ते!