धर्मगुरुने अशी माहिती उघड केल्यास तपास एजन्सीचा तात्पुरता फायदा होईल पण मग धर्मगुरुवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि त्यानंतर कन्फेशन देण्यापूर्वी लोक दहावेळा विचार करतील आणि समाजसुधारणेचा एक महत्त्वाचा रस्ता बंद होईल. फक्त शिक्षा देऊन समाज सुधारत नसतो. माणुसकीला आवाहन केले तर अनेक गुन्हेगार सुधारू शकतात. अगदी काही अपवादात्मक हार्डकोअर गुन्हेगार असतात जे सुधारू शकत नाहीत.
तुम्ही जे दुसरे उदाहरण दिले आहे ते वेगळे आहे. त्यात तुम्ही धर्मगुरू नसल्यामुळे, कोणाचे जर नुकसान होत असेल तर ते टाळणे तुमचे कर्तव्य आहे.