व्यक्तिशः मी मुक्तछंदाला मानीत नाही. तो वेगळा भाग आहे.

या कवितेबाबतः

गद्य व पद्य यातील भेद फारच कमी झाला आहे. प्रामाणिकपणे सांगा, की हेच लिखाण जर कर्ता, कर्म क्रियापद यांचे व्यवस्थित नियम लावून लिहिले असते तर ते याच संकेतस्थळावर 'गद्य साहित्य' म्हणून प्रकाशित होऊ शकले असते की नाही?

माझा असा तीव्र आग्रह आहे की कवितेत काव्य असले तरीही ( जसे आपल्याला आपणच निवर्तल्याचे समजणे ही एक नवीन व चांगली कल्पना या रचनेत आहे )  कवितेला पद्यात्मक पेहराव असणे हेही अत्यंत निकडीचे आहे.

माझे मत आक्रमक वाटले तरीही शांतपणे विचार करून आपले मत कळवावेत अशी विनंती.

कविता ही 'दिसायला तसेच वागायला' कविता असणे हे रचनाकार 'कवी' असल्याचे निदर्शक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

धन्यवाद!