मला वाटते आपली शब्द-मांडणी अयोग्य आहे.

मी आधी सभ्य होतो, आता असभ्य झालो किंवा मुळातच असभ्य होतो यावर आपण मतप्रदर्शन करणे गैर वाटते.

आपण आपला समावेश कुठल्याही कॅटेगरीत केलात तरी मला काही अडचण नाही.

'तुमच्या-माझ्यासारखी' या ऐवजी आपण फक्त 'काही लोक' म्हंटला असतात तरी बरे वाटले असते.

तसेच, मी बोलण्याने बदलेनच व मी बदलायला हवे आहे याबाबतीत आपले मतप्रदर्शन मला गैर वाटते. आपण फक्त आपल्या स्वतःबद्दल बोललात तर बरे होईल.

बोली भाषेत 'आम्ही तुम्ही' वगैरे करतात तश्या पद्धतीने आपण उल्लेख केलेले असतील असा अंदाज येऊ शकतो, पण तरीही त्यात इतरांना समाविष्ट करणे काही रुचले नाही.